पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूरमध्ये भीषण अपघात

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जांब ते शिरूर-ताजबंद रस्त्यावर हा अपघात झाला आहे. स्त्यावरून धावणाऱ्या टेम्पोने भरधाव वेगाने येत या मोटरसायकलला धडक दिली.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेट्रोल भरून निघताना अपघात
सविस्तर माहिती अशी कि, संबंधित तरुण चेरा येथील रहिवासी असून ते चेरा येथून जांबच्या दिशेने निघाले होते. जांब जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून रस्त्यावर येताच त्यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दिगंबर राजगीरवाड व परमेश्वर कावलवाड असे मृत व्यक्तींचे नाव आहे तर सुधाकर पोकलवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.