Lava Blaze 3 5g | Lava Blaze 3 5G भारतात झाला लॉन्च; 50MP कॅमेरासह मिळणार 5,000mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lava Blaze 3 5g | आजकाल मोबाईल ही लोकांची एक गरज झाली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नवनवीन फोनची क्रेझ देखील आजकाल वाढलेली दिसत आहे. अशातच आता तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता बाजारात एक नवीन फोन लॉन्च झालेला आहे. टेक कंपनी Lava ने नवीन लो बजेट सेगमेंट स्मार्टफोन ‘Blaze 3 5G’ 9Lava Blaze 3 5g )लॉन्च केला आहे. Lava Blaze 3 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल. याशिवाय, 6.56 इंच HD+ डिस्प्ले, 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आणि 6GB + 128GB स्टोरेज देखील दिले गेले आहे.

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दोन रंग दिले आहे. ग्लास ब्लू आणि ग्लास गोल्ड रंगामध्ये हे स्मार्टफोन उलपब्ध आहेत. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आहे. 18 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून हा फोन तुम्हाला विकत घेता येऊ शकतो. Lava Blaze 3 मध्ये काचेची रचना आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल प्रदान केला आहे, ज्यामध्ये फ्लॅशलाइटसाठी VIBE रिंग लाइट प्रदान केला आहे. फ्रंट पॅनलबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना पंच होल नॉच आणि फ्लॅट स्क्रीन मिळेल.

Lava Blaze 3 5G

डिस्प्ले |Lava Blaze 3 5g

Lava Blaze 3 5G फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंच HD + डिस्प्ले मिळवू शकतो. स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1600 nits पीक ब्राइटनेस असेल.

कॅमेरा

लावाच्या नवीन फोनमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा मिळत आहे.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, Lava Blaze 3 स्मार्टफोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

OS आणि प्रोसेसर

लावाच्या आगामी फोन Lava Blaze 3 5G मध्ये कंपनीने Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा MediaTek Dimension 6300 प्रोसेसर प्रदान केला आहे.

कनेक्टिव्हिटी |Lava Blaze 3 5g

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्टसह मूलभूत कनेक्टिव्हिटी आहे.