Lava Blaze Curve 5G | 64MP कॅमेरा, 16GB RAM सह Lava ने लाँच केला अप्रतिम मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Lava ने भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Lava Blaze Curve 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 64MP कॅमेरा आणि 16GB RAM सह अनेक दमदार फिचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनचा लूक सुद्धा अतिशय प्रिमिअम असा आहे. आज आपण Lava च्या या नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

6.67 इंच डिस्प्ले –

Lava Blaze Curve 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच FHD+ कर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 394 ppi असून पीक ब्राईटनेस 800 nits पर्यंत आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek डायमेंशन 7050 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो. Lava च्या या मोबाईल मध्ये 8GB LPDDR5 रॅम देण्यात आली असून तुम्ही ही रॅम 16GB पर्यंत वाढवू शकता. याशिवाय हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणला आहे.

कॅमेरा- Lava Blaze Curve 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Lava Blaze Curve 5G च्या पाठीमागील बाजूला 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेराआहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये स्लो मोशन, टाइमलॅप्स, ब्युटी मोड, एचडीआरएम नाईट लाइट, पोर्ट्रेट यासह इतर फीचर्सचा सुद्धा समावेश आहे. मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती ?

Lava Blaze Curve 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे तर 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. येत्या 11 मार्चला लावा ई-स्टोअर, ॲमेझॉन आणि रिटेल स्टोअर्सवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हा स्मार्टफोन Viridian आणि Iron Glass अशा दोन रंगात खरेदी करू शकता .