दिवाळीचा गोडवा वाढवणारा ‘लंवग लतिका’ पदार्थ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HppyDiwali |लवंग लतिका हा पदार्थ मूळचा पश्चिम बंगालचा. पण महाराष्टातील काही घरांत हा पदार्थ पूर्वी हमखास केला जायचा. होळी, दसरा, दिवाळी या दिवसांत हा पदार्थ केला जातो. गोड, काहीशी खुसखुशीत अशी ही लवंग लतिका लगेचच फस्त व्हायची.

साहित्यः १ वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, पिठी साखर, खवा, चारोळ्या मूठभर, काजू तुकडा, २० ते २५ लवंगा, साखर २ वाटय़ा, पाणी व तळण्यासाठी तूप.

कृतीः प्रथम रवा व मैदा चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालून गरम तुपाचे मोहन घालावे. हाताने चांगले मिसळावे व त्यात कोमट पाणी घालून भिजवावे. पाव किलो खवा कुस्करून भाजून घ्यावा. थंड झाले की त्यात पिठीसाखर, चारोळे, काजू – बदाम, वेलची पूड घालून सारण तयार करावे. पिठाच्या लिंबाएवढय़ा गोळ्या करून पुरीएवढे लाटावे. त्यात खव्याचे सारण भरून घेऊन पानाच्या विडय़ाप्रमाणे आकार करून त्याला प्रत्येकी २ लवंगा टोचाव्यात. अशा सर्व लतिका करून तुपात मध्यम आचेवर तळाव्यात. २ वाटय़ा साखरेत १ वाटी पाणी घेऊन २ तारी पाक करावा. त्यात एक-एक करून सर्व लतिका टाकाव्यात व सर्व बाहेर काढून सुकवून घ्याव्यात व अशा प्रकारे सर्व लतिका तयार.

Leave a Comment