विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण शाळा महाविद्यालय बंद आहेत. परंतु ऑनलाइन पद्धतीने शिक्षण अपोजिट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण तसेच परीक्षाही घेतल्या जात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेतल्या गेल्या, परंतु काही परीक्षाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. त्याचबरोबर वकिली व्यवसाय करणाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया इक्झामिनेशन या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 15 जुलै होती. परंतु निकाल न लागल्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज भरता येत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

मे महिन्यामध्ये विधी शाखेच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार आहेत परंतु प्रथम वर्षाचे निकाल जाहीर केल्याशिवाय पुढील वर्गाचे निकाल जाहीर करता येणार नाही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. आठवडाभरात या शाखेच्या सर्वच वर्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी सांगितले आहे.

You might also like