‘लॉ’च्या विद्यार्थ्यांना दिलासा! बार काउन्सिल ऑफ इंडियाने अंतिम सत्र वगळून परीक्षा केल्या रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील विधी  महाविद्यालयांमध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष वगळता यंदा परीक्षा द्यावी लागणार नाही. सर्वांना परीक्षेशिवाय प्रमोट केले जाणार आहे. मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, लॉ  पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मागील वर्षाचे गुण आणि चालू वर्षाचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण याआधारे प्रमोट केले जाईल. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नवे निर्देशही जारी केले आहेत.

दरम्या, कॉलेज उघडल्यानंतर जर संस्थांची इच्छा असेल तर ज्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेता येऊ शकेल असंही बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. मात्र, यासाठी एक वेळेची विशिष्ट मर्यादा असेल. जर विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाला नाही, तर त्याला पुन्हा डिग्री पूर्ण होईपर्यंत एक संधी आणखी मिळेल. ही परीक्षा क्लिअर केल्यानंतरच पदवी दिली जाईल.३ किंवा ५वर्षांचा एलएलबी कोर्स करत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत समाविष्ट होण्याचीही परवानगी दिली जाईल.

अंतिम वर्षासाठी संबंधित संस्था किंवा विद्यापीठे परीक्षा आयोजित करण्याच्या अन्य योग्य पद्धती अवलंबू शकतात. त्या वर्षीचे सत्र परीक्षांचे अंतर्गत गुण दुप्पट केले जाऊ शकतात, किंवा प्रत्येक पेपरसाठी प्रोजेक्ट किंवा रिसर्च रिपोर्ट तयार करायला सांगता येऊ शकते. विद्यापीठांना निर्देश दिले आहेत की परीक्षेचे आयोजन करताना उच्च शैक्षणिक स्तर लक्षात घेतला जायला हवा. सोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्याशीही कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in