वकील महाशयांनी चक्क बनियनवरच केली युक्तीवादाला सुरुवात, पुढं असं काही झालं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । ‘वर्क फ्रॉम होम’ या सवलतीचा काहीजण कसा अर्थ लावतायत याचं एक भन्नाट आणि विचित्र उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळालं. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक केसेसची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सनं करण्याची परवानगी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी दिली आहे. अशाच एका केसमध्ये सुनावणीसाठी राजस्थान हायकोर्टातून एका वकिलाला कॉन्फरन्स कॉल लावला गेला. तर वकील महाशय चक्क बनियनमध्येच युक्तीवादाला उभे राहिले. हे बघताच न्यायाधीशांची तळपायातील मस्तकात गेली. त्यांचा पारा चढला आणि त्यांनी तातडीनं सुनावणीच बंद केली. परंतु पुढं असं काही झालं ज्यामुळं वकील महाशयाच्या वर्तनाचा फटका त्याच्या अशिलाला फटका बसता-बसता राहिला.

असा घडला किस्सा
राजस्थान हायकोर्टातले न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा हे क्रिमिनल केसेसचा निवाडा करत होते. दुपारी १२ वाजता आरोपी विनोदच्या केसचा नंबर आला. त्यावेळी कोर्टातून त्याच्या वकिलांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी फोन लावण्यात आला, तर हे वकील महाशय त्यावेळी बनियनमध्ये होते आणि तसेच युक्तीवादाला उभे राहिले. त्यांचा हा अवतार बघून न्यायमूर्तींनी तात्काळ व्हिडीओ कॉल कट केला आणि रागारागाने त्यांंनी याचिकाच फेटाळायचं ठरवलं. पण तिथं उपस्थित असलेल्या सरकारी अधिवक्त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी केसमध्ये पुढली तारीख दिली.

हायकोर्टाच्या गाईडलाईन्समध्येही युक्तीवादा वेळी तुम्ही प्रॉपर ड्रेसमध्ये असला पाहिजेत असं म्हटलं आहे. पण तरीही असे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये याच न्यायमूर्तींच्या बाबतीत महिनाभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. त्यामुळे आता बार असोसिएशनकडे नाराजी व्यक्त करत त्यांनी वकिलांना समज द्यायला सांगितलं आहे. वकीलांना आपल्या व्यावसायिक कर्तव्याचं भान न राखण्याची अशी उदाहरण फक्त आपल्या देशातच घडली अशातला भाग नाही. अशा घटना इतर देशात सुद्धा घडल्या आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात मागच्या महिन्यातच अशा घटना समोर आल्या होत्या. झूम एपवरुन युक्तीवाद सुरु असताना एक पुरुष वकील उघड्या अंगानेच युक्तीवादाला उभे राहिले तर एक महिला अँटर्नी चक्क बेडवर अंथरुणातून बाहेर न पडताच सहभागी झाल्या होत्या.

Rajasthan HC adjourns hearing after lawyer appears in 'Baniyan'

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment