एलसीबीच्या धडाक्याने कराडच्या डीबीची लक्तरे वेशीवर ; कराडला गुन्हेगारी रोखण्यासाठी असणारा डीबी विभाग नावापुरताच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । सातारा

एलसीबीच्या धडाक्याने कराडच्या डीबीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कराडला गुन्हेगारी रोखण्यासाठी असणारा डीबी विभाग नावापुरताच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी मौजे गोळेश्वर कराड येथे क्रिकेट आयपीएल सट्टयावर स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांचेकडून छापा टाकून कारवाई केली जात असताना कराडचा डीबी विभाग झोपेत असल्याचे पहायला मिळाले.

पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांना बातमी मिळाली होती की , मौजे गोळेश्वर (ता कराड) या गावचे हद्दीतील सज्जाद युनुस कच्छी यांचे मालकीचे माया एलाईटी काँटी रोहाऊस नं .४ मध्ये काही इसम चेन्नई विरुध्द दिल्ली या २०-२० आयपीएल क्रिकेट सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दवारे संपर्क साधुन सट्टा नावचा जुगार चालवित आहेत . त्याप्रमाणे त्यांनी सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकणेबाबत सुचना दिल्या . सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी व त्यांचे पथकाने गोळेश्वर कराड हद्दीतील मिळाले बातमी ठिकाणी सापळा लावुन छापा टाकला असता तेथे चार इसम हायप्रोफाईल पध्दतीने चेन्नई विरुध्द दिल्ली या २०-२० क्रिकेट आयपीएल सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दवारे सट्टा नावचा जुगार चालवित असताना मिळुन आले त्यांचेकडे १ एलसीडी व सेट टॉप बॉक्स , १ लॅपटॉप , ० ९ मोबाईल फोन , टु व्हिलर गाडया , रोख रक्कम व जुगार साहीत्य असा एकुन ४,०२,८०० / – ( चार लाख दोन हजार आठशे ) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे . अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा , श्री.धिरज पाटील , अपर पोलीस अधीक्षक , सातारा , यांचे सुचनांप्रमाणे व श्री.सर्जेराव पाटील , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे , पोहवा सुधीर बनकर , अतिष घाडगे , संजय शिर्के , पोना साबीर मुल्ला , शरद बेबले , मंगेश महाडीक , मुनीर मुल्ला , प्रविण फडतरे , प्रमोद सावंत , पो.कॉ वैभव सावंत मोहसीन मोमीन , मयुर देशमुख , चालक पो.ना संजय जाधव , विजय सावंत यांनी सहभाग घेतला . सदर कारवाईमध्ये सहभाग घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा , श्री.धिरज पाटील , अपर पोलीस अधीक्षक , सातारा , यांनी अभिनंदन केले आहे .

आरोपींची नावे : १. वशिम इक्बाल मेमन वय ३३ वर्षे , रा . १ ९ ७ , गुरुवार पेठ , कराड ता कराड जि.सातारा . २.समीर जावेद शेख वय २० वर्षे , रा कार्वेनाका कराड ता कराड जि.सातारा . ३.मुनीर दस्तगीर चबनुर वय २ ९ वर्षे , रा शनिवार पेठ , कराड ता कराड जि.सातारा . ४.जैद जलालउद्दीन पालकर , वय २२ वर्षे , रा मंगळवार पेठ , कराड ता कराड जि.सातारा .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment