सातारा शहरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्यास एलसीबीकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | एका विशिष्ट ॲपचा वापर करून ऑनलाइन फोन पे, गुगल पे यावर खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम दिल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इसमास सातारा गुन्हे अन्वेशन प्रकटीकर (एलसीबी) पथकाने एकास अटक केली आहे. तानाजी बाळकृष्ण जानकर (वय- 24, मूळ रा – पळसाडे, सध्या- गडकरी आळी, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पंचायत समितीच्या बाजूस असलेल्या स्वेटर विक्रेते यांच्याकडून एका अनोळखी इसमाने तेथून स्वेटर खरेदी केला. सदरची रक्कम देणे करिता त्याने पेटीएमची मागणी केल्यानंतर त्यांना दिलेला कोड व पैसे ट्रान्सफर केल्याचा बनावट मेसेज दाखवला. परंतु सदर कोडवर पैसे जमा न झाल्याने सदर स्वेटर व्यवसायिकास पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात आले. तेव्हा स्वेटर व्यावसायिकाने संशयित ग्राहकास आपण पैसे जमा झाल्यावर जावे, असे सांगितले.

मात्र, स्वेटर व्यावसायिकास सदर इसमावर संशय आला होता. त्या माणसाने काहीतरी गडबड केल्याचे लक्षात आले. परंतु ग्राहक तानाजी जानकर याने पैसै मिळाले नाही तर माझ्या नंबरवर फोन करा असे सांगून पळ काढला. स्वेटर व्यवसायिकांने त्या नंबरला फोन केल्यानंतर फोन चुकीचा नंबर वर लागला आहे, असे सांगण्यात आले. यावर स्वेटर व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि सदर प्रकार सांगून गुन्हा दाखल केला.

Leave a Comment