सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका बुकी समीर कच्छी याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यात 16 लाख 26 हजार 70 रूपयांचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करत 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा गुन्हे अन्वषेण विभागाने एकाच दिवसात ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील मटका धंद्याचा मोठा बुकी शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा जिल्हयातील मटका व्यावसायिकांचा प्रमुख असून सर्व आर्थिक बाबी त्याच्या निर्देशानुसारच चालत होत्या. त्याच्यावर कारवाई करून मटका व्यवसायाचे कंबरडे मोडणे गरजेचे झाले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत खंबीर पावले उचलली आहेत, तरीही अनेक गुन्हेगार जागा बदलून, ठिकाण बदलून आपले व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी हा त्याचे काळेवस्ती, सैदापूर, सातारा येथील राहते घरामध्ये कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार अड्डा चालवित होता. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे छापा टाकला असता कच्छी हा त्याच्या 20 साथिदारांसह जुगार अड्डा चालवित असताना मिळून आल्याने त्याच्यासह सर्वांना ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून 16 लाख 26 हजार 70 रुपये किमतीचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करून त्याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये ः- शमिम ऊर्फ समीर सलीम शेख ऊर्फ कच्छी (वय- 42, रा. काळे वस्ती, सैदापूर), धनंजय संपतराव कदम (वय- 55, रा. 891 शनिवार पेठ), अश्विन विनायक माने (वय- 45, रा. शेंद्रे, ता. सातारा), नासिर हुसेन दिलावर शेख (वय- 40, रा. बुधवार पेठ), सलीम कादीर खान (वय- 35), शकिल कादर सय्यद (वय- 51, रा. 259 शनिवार पेठ), विष्णू काशिनाथ सोनटक्के (वय-45, मूळ रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), राजेश संपत कदम (वय- 53, रा. पिलेश्वरीनगर, करंजे), विकास राजू चव्हाण (वय- 30, रा. शनिवार पेठ), संतोष रामचंद्र माने (वय- 46, रा. कोंडवे ता. सातारा), अक्षय जोतिराम सोनावणे (वय- 21, रा. मुजावर कॉलनी, कराड), गजानन चंद्रकांत इरकल (वय- 51, रा. शुक्रवार पेठ), किशोर दिलीप साळुंखे (वय- 26, रा. माळवाडी, ता. सातारा), असद वाहिद सय्यद (वय- 27, रा. जगदीश्वर कॉलनी, सैदापूर) असिफ बशीर खान (वय- 38, रा. 672 शनिवार पेठ), साहिल शमिम ऊर्फ समीर शेख ऊर्फ कच्छी (वय- 19, रा. काळेवस्ती सैदापूर), संतोष मोहन गुरव (वय- 32, रा. काशीळ, ता. सातारा), प्रकाश तानाजी बोभाटे (वय- 32, रा. मुळीकवाडी, ता. सातारा), श्रीकांत लक्ष्मण पाटील (वय- 65, रा. पाटखळ, ता. जि. सातारा), अमर गणेश पवार (वय- 20, रा. गंगासागर कॉलनी मोळाचा ओढा) अशी त्यांची नावे आहेत.