कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार – सदाभाऊ खोत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. “एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवा समाप्ती निर्णय मागे घेणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची घोषणा परब यांनी केली. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सुरु असलेल्या पत्रकार परिषदेतुन बाहेर पडत राज्य सरकारच्या प्रस्तावाबाबत व संपाबाबत आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत विलीनीकरण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयानंतर याबाबत सर्वोतोपरी निर्णय कर्मचारी घेणार असून त्याच्याशी चरचा करणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की, हे केले जाणारे आंदोलन, हा सुरु असणारा संप आमचा नसून कर्मचाऱ्याचा आहे. त्यामुळे आंदोलनाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कर्मचाऱ्यांना घायचा आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी जी काही घोषणा केली आहे.  त्याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहोत.

Leave a Comment