मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुसती पोकळ आश्वासने नको, तातडीने मदत करा – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्याचे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी आताच राज्य सरकारने कोणत्याही स्वरूपाचे निकष न लावता सरसकट मदत करावी अशी मागणी होत आहे. येथील नुकसानीवरून आता भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाना साधला जात आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकसानीवरून ट्विटद्वारे आवाहन केले आहे. “केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

मराठ्वाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केल्यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर निशाणा साधला आहे. “राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.

 

अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे.