हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कित्येक गोष्टी सहज-सोप्या पद्धतीने करणे मानवाला शक्य झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या दिवसेंदिवस फ्रॉड कॉल, फेक मेसेजेसचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्येच सर्वात चर्चेत आहे ते ‘प्रेस 9 टू गॉट स्कैम्ड’. या फसवणुकीच्या प्रकाराअंतर्गत आजवर अनेक लोकांचे पैसे लुबाडण्यात आले आहेत. आता तर FedEx कंपनीचे नाव वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आज आपण “प्रेस 9 टू गॉट स्कैम्ड” नेमके काय आहे? याविषयी जाणून घेणार आहोत.
प्रेस 9 टू गॉट स्कैम्डमध्ये स्कॅमर स्मार्टफोन वापरकर्त्यांना 9 नंबर दाबण्यासाठी सूचित करतात. ह्या नंबर दाबल्यानंतर तुमचा कॉल प्रतिनिधीला जोडला जातो. हा प्रतिनिधी तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करतो. यानंतर तो तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स देतो. तसेच लॉटरीसंदर्भात देखील तुमच्याशी चर्चा करतो. हे स्कॅमर्स तुम्ही जाळ्यात अडकावे यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात. महत्वाचे म्हणजे, सध्या लोकांना FedEx वरून हे फसवणुकीचे कॉल येत आहेत. ज्यातून अनेक लोकांचे पैसे लुबाडण्यात येत आहेत.
सध्याच्या घडीला AI च्या आगमनामुळे या घोटाळ्यांचा उलगडा करणे कठीण झाले आहे. कारण की, अनेकवेळा समोरील स्कॅमरच AI व्हॉईस सिस्टमचा वापर करत असतो. अनेकवेळा तर स्कॅमर्स बनावट सूचना, तातडीचे संदेश किंवा ॲप्स डाउनलोड करण्यासाठी समोरील व्यक्तीला ऑफर देत असतात. तसेच, स्कॅमर्स OTP नंबर, वैयक्तिक माहिती याबाबत देखील विचारणा करतात. ही माहिती मिळाल्यानंतर स्कॅमर्स समोरील व्यक्तीला फसवणे, त्यांच्याकडून पैसे लुटल्याचे काम करतात. त्याचबरोबर, समोरील व्यक्तीला फसवण्यासाठी स्कॅमर्स डेटाचा वापर करतात.
खरं तर, अनेकवेळा अशा घटनांमध्ये पीडित व्यक्तीची चूक असते. कारण की, अनेकवेळा कोणत्याही नंबर वरून आलेल्या फोनवरील व्यक्तीला आपली माहिती देण्यात येऊ नये. असे वारंवार सांगितले जाते. तसेच, बँका, FedEx किंवा शासनाकडून येणारे कॉलही तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारत नाही. परंतु काही स्कॅमर विश्वासार्हता वाढवण्यासाठी कायदेशीर फोन नंबर वापरून कॉल स्पूफिंगचा वापर करतात. आणि त्यांचे वास्तविक नंबर लपवण्यासाठी व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे कधीही अशा प्रकारचे कॉल मेसेजेस आल्यानंतर क्रॉस-तपासणी करा.
तसेच, समोरील व्यक्ती जी कोणती माहिती देत आहे ती माहिती वेबसाईटवर जाऊन चेक करा. सर्व ॲप्स आणि सॉफ्टवेअर स्ट्रॉंग पासवर्ड करून लॉक ठेवा. जेणेकरून कोणत्याही सुरक्षा त्रुटीचा गैरफायदा घेतला जाणार नाही. तुम्हाला सीबीआय किंवा पोलिसांकडून फोन आला तर अशावेळी तुम्ही घाबरून जाऊ शकता. परंतु त्यावेळी देखील आपली कोणतीही वैयक्तिक माहिती समोरील व्यक्तीला शेअर करू नका. यासह नेहमी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीची माहिती जाणून घ्या.