कधीकाळी रिकाम्या हाताने अमेरिकेत आलेल्या एलन मस्क यांचा संघर्ष जाणून घ्या

नवी दिल्ली । आज आपण ज्या अभिमानाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कचे नाव घेतो आणि त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहतो. मात्र आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे कि, त्याची एके काळी फारच खराब अवस्था होती. आपल्या जुन्या दिवसांविषयी सांगताना एलन मस्क म्हणाले की, “जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता, ते रिकाम्या खिश्याने इथे आले होते.”

ऑटोमोटिव्ह उद्योगाला ऑल-इलेक्ट्रिक फ्युचर्सकडे वळवण्याच्या जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या भूमिकेचे कौतुक करत, टाईम मॅगझिनने त्यांना “पर्सन ऑफ द इयर” म्हणून घोषित केल्याच्या एका दिवसानंतर एलन मस्क यांनी आपल्या अमेरिकेतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.

जेव्हा एलन मस्क जेफ बेझोसला मागे टाकून या वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, तेव्हा त्यांना अमेरिकेतील आपले सुरुवातीचे दिवस आठवले, तेव्हा मस्क यांनी ट्विट केले, “मी पैशाविना अमेरिकेत आलो. स्कॉलरशीप आणि काम केल्यानंतरही, जेव्हा पदवीधर झालो तेव्हा देखील माझ्यावर $100 पेक्षा जास्त कर्ज होते. मला शिक्षणासाठी शाळेत नोकरीही करावी लागली.”

Elon Musk

 

Elon Musk Tweet

फायनान्शिअल टाईम्स एलन मस्कबद्दल लिहितात, “भलेही पुढील काही वर्षात टेस्ला कोसळेल मात्र तरीही… मस्कने कदाचित जगातील सर्वात महत्त्वाच्या उद्योगांपैकी एक अशा प्रकारे बदलून टाकला असेल ज्यामुळे सरकार, गुंतवणूकदार आणि हवामान बदलांवर याचा खोल परिणाम होऊ शकेल.”

जरी “पर्सन ऑफ द इयर” ही पदवी जागतिक नेत्यांना दिली जाते, मात्र कधीकधी ती व्यावसायिकांना देखील दिली जाते. 6 नोव्हेंबर रोजी, मस्कने आपल्या ट्विटर फॉलोअर्सना टेस्लामधील 10 टक्के हिस्सा विकण्याविषयी विचारले. बहुसंख्य फॉलोअर्सने त्यांना “होय” असे उत्तर दिले. त्यानंतर मस्कने टेस्ला इंकच्या आपल्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त शेअर्सची विक्री केली आहे.

76,000 कोटी टॅक्स
टाइम मॅगझिनने एलन मस्क यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केल्यानंतर त्यांचा अवघड टप्पा सुरू झाला आहे. यूएस सिनेट सदस्य एलिझाबेथ वॉरन यांना त्यांची पदवी आवडली नाही. त्यांनी ट्विटरवर मस्क यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला. त्यांना पर्सन ऑफ द इयर ऐवजी टॅक्स रिगर म्हंटले पाहिजे, असे वॉरन म्हणाले. यानंतर वॉरन आणि एलन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यानंतर मस्क म्हणाले की,” या वर्षी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक टॅक्स देणारे बनणार आहे.”

अमेरिकेची वृत्तसंस्था ब्लूमबर्गने अंदाज वर्तवला आहे की,’या वर्षी त्यांना 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 76 हजार कोटींचा टॅक्स भरावा लागेल. असे झाल्यास ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त टॅक्स भरणारे ठरतील.’