टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घ्या

नवी दिल्ली I इन्शुरन्स हे एक आवश्यक साधन बनले आहे. कोरोनामुळे लोकांना इन्शुरन्सचे महत्त्व चांगलेच समजले आहे. सद्य बाजारात टर्म इन्शुरन्सची खूप मागणी आहे. लोकं टर्म लाइफ इन्शुरन्सला जास्त महत्त्व देत आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या जाण्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये.

एखादी आपत्कालीन किंवा दुर्दैवी परिस्थिती जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे उर्वरित कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकते. टर्म इन्शुरन्स घेऊन तुमच्यानंतरही तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळत राहील याची तुम्ही खात्री करू शकता.

आयुष्य निश्चित कालावधीसाठी सुरक्षित
मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या मते, टर्म इन्शुरन्स प्लॅन हा लाईफ इन्शुरन्सचा एक प्रकार आहे ज्यानुसार पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाकडून नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. या इन्शुरन्स पॉलिसीला टर्म इन्शुरन्स असे म्हणतात कारण ती पॉलिसीधारकाचे आयुष्य एका विशिष्ट कालावधीसाठी कव्हर करते. यामध्ये पॉलिसीची मुदत संपल्यावर पॉलिसीधारक सुरक्षित राहिल्यास, टर्म प्लॅन त्याला कोणतीही मॅच्युरिटी रक्कम देत नाही. हेच कारण आहे की,टर्म इन्शुरन्स इतका स्वस्त आहे.

इन्शुरन्स कंपन्याही टर्म प्लॅन विकण्यात रस दाखवत आहेत. टीव्हीवर टर्म लाइफ इन्शुरन्सच्या भरपूर जाहिराती आहेत. बाजारातही अनेक प्रकारचे इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आहेत. टर्म लाइफ इन्शुरन्स देताना, इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीधारकाच्या मेडिकल टेस्ट रिपोर्ट मागतात. मात्र अशा काही कंपन्या आहेत ज्या मेडिकल टेस्टकडे फारश्या लक्ष देत नाहीत.

ज्या इन्शुरन्स कंपन्या अटी किंवा नियमांच्या बाबतीत कठोर नसतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे इन्शुरन्स एक्सपर्टचे म्हणणे आहे. कारण योग्य मेडिकल टेस्ट रिपोर्टशिवाय क्लेम कॅन्सल केला जाऊ शकतो. कारण, ज्या पॉलिसीधारकाने आपल्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती दिली नाही, अशा स्थितीत, नॉमिनीला क्लेम सेटलमेंट करण्यात खूप अडचणी येऊ शकतात.

योग्य मेडिकल टेस्टनंतरच टर्म इन्शुरन्स
तुम्ही जेव्हाही टर्म इन्शुरन्स घ्याल तेव्हा तुमची मेडिकल टेस्ट योग्य प्रकारे करून घ्या. मेडिकल टेस्टनंतर रिपोर्टची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी आणि डॉक्टरांवर असते. अशा परिस्थितीत, नॉमिनीला क्लेम निकाली काढताना फारसा त्रास होत नाही.

टर्म इन्शुरन्सचे फायदे

टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतो.

टर्म प्लॅन्सना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

नॉमिनी व्यक्तीला इन्शुरन्सची रक्कम एकरकमी किंवा मासिक देण्याचा पर्याय.

पॉलिसी कव्हर कालावधी जास्तीत जास्त 10 वर्षे आणि कमीत कमी 50 वर्षे.