14 डब्यांना सोडून धावत्या रेल्वेचे इंजिन गेले पुढे, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आपल्या वेगात धावणाऱ्या औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेसचे इंजिन 14 डब्यांना सोडून पुढे गेल्याची घटना आज सायंकाळी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेवर रवाना झाली. काही अंतरावर जात नाही तोच कपलिंग निघाल्याने रेल्वेचे इंजिन बोगींपासून तुटले आणि बऱ्याच पुढे गेले. हा सर्व प्रकार लक्षात येताच रेल्वे चालकाने इंजिन थांबवले. परंतु, तोपर्यंत इंजिन बऱ्याच पुढे निघून गेले होते. हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्यात आला. यानंतर इंजिन पुन्हा मागे आणून त्यांना जोडून रेल्वे आपल्या प्रवासासाठी रवाना झाली. यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याने रेल्वे सेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही.

वेटींग टिकीतांवरच करावा लागतो प्रवास –
दिवाळीनिमित्त परभणी, नांदेड, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. सचखंड एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस यासह बहुतांश रेल्वे प्रवाशांची चांगलीच गर्दी होत आहे. जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे‌. अशा परिस्थितीमुळे वेटिंग तिकिटं वरचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तसेच प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नंदिग्राम एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस तसेच मराठवाडा एक्सप्रेस ला तिकिटांची सुविधा नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केवळ दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी धावणाऱ्या रेल्वे जनरल तिकीट देण्यात आले आहे. याविषयी प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment