आरक्षण सोडत : पाटण नगरपंचायतीत 9 महिलांसह नव्यांना मिळणार संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | पाटण नगरपंचायत सदस्यांसाठी शुक्रवारी झालेल्या आरक्षणामध्ये 17 पैकी 9 प्रभाग महिला आरक्षित झाले. यात सर्वसाधारणमध्ये चार, सर्वसाधारण महिला पाच, इतर मागासवर्गीय दोन, इतर मागासवर्गीय महिला दोन,अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती महिला दोन, भटक्या विमुक्त जाती एक अशा पद्धतीने सतरा प्रभागातील आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग क्रमांक 7 सोडता सर्वच प्रभागात आरक्षणाने नव्यांना संधी मिळणार आहे.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता येथील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पाटण नगरपंचायत सदस्य आरक्षण सोडतीला उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली .यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष अजय कवडे ,उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, राजेंद्र राऊत , तलाठी जयेश शिरोडे ,सौ. शीतल भोसले आदी मान्यवर अधिकारी, पदाधिकारी ,कार्यकर्ते व पाटणमधील अनेक इच्छुक उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी लोकसंख्येचा निकष व उतरत्या चक्राकार क्रमाने आरक्षणे जाहीर करण्यात आली. यात पहील्यांदा अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जाती महिला, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय महिला, सर्वसाधारण महिला व शेवटी सर्वसाधारण खुला प्रभाग निहाय आरक्षणे जाहीर करण्यात आली. अत्यंत नियोजन पद्धतीने व शांततेत ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. लहान मुलांच्या सहाय्याने आरक्षित चिठ्ठ्या काढून आरक्षित प्रभाग जाहीर करण्यात आले.

या आरक्षण सोडतीमध्ये शहरातील सतरा प्रभागातील आरक्षण व सर्वसाधारण प्रभाग पुढीलप्रमाणे सर्वसाधारण खुला – प्रभाग 4, 6, 11, 17, सर्वसाधारण महिला 2, 5, 7, 14, 15, इतर मागासवर्गीय 3, 8, इतर मागासवर्गीय महिला 10, 13, अनुसूचित जाती 1, अनुसूचित जाती महिला 16, 12, भटक्या विमुक्त जाती 9 अशा पद्धतीने प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे.