औरंगाबाद | पंचवीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रेणुका संतोष गोडसे (रा. केकत जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. केकत जळगाव येथील गट नंबर 14 मधील भागवत बडे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले आहे.
शवविच्छेदन विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रेणुकाच्या पश्चात दोन चिमुकले असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.