Lebanon Pager Blast | लेबनॉनमध्ये पेजरद्वारे झाला मोठा स्फोट; पेजर म्हणजे नेमकं काय?

Lebanon Pager Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lebanon Pager Blast | सध्या इस्राईल जवळ असलेल्या लेबनॉन येथे युद्ध होत आहे. ते युद्ध आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हायला लागलेले आहे. अनेक शहरांमध्ये लोकांच्या खिशात असलेले पेजर अचानक रस्त्यात आणि बाजारात स्फोट लागलेले आहे. ठीक ठिकाणी या पेजर्समध्ये दहशतवादी संघटनेची जवळपास 2750 सदस्य जखमी झालेले आहेत. आतापर्यंत आठ लोक ठार झालेले आहे. पेजर हे माहितीची देवाण-घेवाण करणारे हे छोटेसे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आहे. अनेक लोकांच्या मृत्यूसाठी हे पेजर कसे काय कारणीभूत ठरत आहे? एवढा मोठा हल्ला कसा काय होत आहे? इलेक्ट्रॉनिक उपकरण मधून इतक्या लोकांना कशी काय बाधा होत आहे? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पेजर म्हणजे काय ? | Lebanon Pager Blast

पेजर हे छोटेसे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन डिवाइस आहे. हे डिवाइस संदेश पाठवण्यासाठी वापरले जाते. 90 च्या दशकापर्यंत जगभरात पेजर मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. परंतु हळूहळू मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा शोध लागला. आणि पेजर वापरातून कमी झाले. परंतु अनेक दहशतवादी संघटना आणि गुन्हेगार पेजर वापरतात. या पेजवर स्क्रीनवर मेसेज दिसतो. तसेच एखाद्याचा क्रमांक देखील दिसतो. जेव्हा पेजवर मेसेज येतो तेव्हा व्हायब्रेशन जाणवते. किंवा बीप असते. त्याला बीपर असे म्हणतात. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी शांतता बाळगणे गरजेचे असते. त्यावेळी पेजरचा वापर केला जातो.

पेजर कसे काम करते ?

पेजर हे मोबाईल जेव्हा इतर कम्युनिकेशन डिवाइस पेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. या पेजरद्वारे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी डिवाइसमध्ये त्या व्यक्तीची रेडिओ रिक्वेन्सी सेट करावी लागते. आणि त्यानंतरच तुम्ही संदेश पाठवू शकता. परंतु यावर कॉलिंगची सुविधा नाही.

पेजरचे किती प्रकार पडतात ?

पेजरचे एकूण तीन प्रकार पडतात. पहिले म्हणजे वनवे पेजर. यामध्ये फक्त तुम्हाला मेसेज मिळू शकतो. तुम्ही दुसऱ्याला मेसेज पाठवू शकत नाही. दुसरा म्हणजे टू वे पेजर. यामध्ये तुम्हाला एसएमएस पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा असेल. तिसरा म्हणजे व्हॉइस मेसेज. यामध्ये तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड केलेले मेसेज पाठवू शकता.

पेजरद्वारे स्फोट कसे झाले ?

पेजरमध्ये स्फोटके आधीपासूनच असावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हेझबोलाने या हल्ल्यामागे इस्राईलचा हात असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. दहशतवादी वापरत असलेल्या पेजरमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला जात होता. या बॅटरीमध्ये स्पॉट झाला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. लिथियमची बॅटरी जर प्रमाणापेक्षा जास्त गरम झाली तर त्यातून धूर निघतो. त्यामुळे ही बॅटरी वितळण्याची आणि आग निर्माण होण्याची क्षमता निर्माण होते. तशाच प्रकारे बॅटरी तुमचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स वाहनात वापरल्या जातात. आणि या 590 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापल्या तर त्याला आग लागते.