परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विधिसेवा महाशिबिर व प्रशासकीय समाधान शिबीर सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी पार पडले.
या महाशिबिराचे उदघाटन मुबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी .वराळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून खंडपीठ औरंगाबाद खंडपीठच्या न्यायमूर्ती विभा कांकन वाडी यांनी या शिबिरास हजेरी लावली. या शिबिराचे अध्यक्षस्थान परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीचे एच. एस. महाजन यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर,पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाधाय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पृथ्वीराज, बाळासाहेब नागरगोजे, ऍड.राजेश चव्हाण, ऍड. टी .ए. चव्हाण, आमदार मेघना बोर्डीकर, सेलू नगराध्यक्ष विनोद बोराडे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा सुरुवात झाली तर शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर लाभार्थ्यांना धनादेश व विविध प्रमाणपत्रे देण्यात आली. सदरील शिबिराला हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली हजेरी लावली होती. उपस्थित मान्यवरांसमोर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून महिला सुरक्षा विषयक प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.