Legend Pele Death : महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (Pelé) यांचे गुरुवारी निधन अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले (Pelé) यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

वडिलांकडून फुटबॉलचे धडे
पेले (Pelé) यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 मध्ये ब्राझीलमधील लहानशं शहर ट्रेस कोराकोसमध्ये झाला होता.पेले यांनी आपल्या वडिलांकडून फुटबॉलचे धडे गिरवले होते. त्यांच्या वडिलांच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ते फ़ुटबॉल खेळू शकले नव्हते. मात्र त्यांनी आपलं स्वप्न मुलगा पेले यांना महान खेळाडू बनवून पूर्ण केलं.

पेले (Pelé) यांनी फुटबॉल विश्वात दोन दशके त्यांनी अधिराज्य गाजवलं. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाशिवाय ब्राझीलमधील क्लब सांतोसकडून ते खेळायचे. आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1366 सामन्यांमध्ये त्यांनी 1281 गोल केले. त्यांची गोल सरासरी 0.94 इतकी होती. तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे ते एकमेव फुटबॉलपटू आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी