Tuesday, June 6, 2023

…. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही ; अजित पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. अधिवेशनात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देताना राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफी देण्याच्या घोषणेबाबत माहिती दिली. तसेच अजूनही काही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही हे मान्य केले. मात्र, कोरोनाचे संकट आले. एक लाख कोटीपेक्षा जास्तीचा टॅक्स वसूल झालेला नाही. तरीही आम्ही शेतकऱ्याना कर्जमाफीची मदत देणार आहे. आम्ही घोषणेपासून पळ काढणार नाही, असा राज्यातील शेतकर्याना मी शब्द देतो असे पवार म्हणाले.

मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याना कर्जमाफी, कर्जपुरवठा तसेच मदतीच्या मुद्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती नियोजन विस्कटल्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं 50 हजारांचे देणं बाकी राहिले आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांना निधी देता आला नाही. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्यानंतर 7 मंत्र्यांचे कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.

कर्जमाफीची घोषणा झाली आहे. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं देणं देता आलं नाही’. तसेच 3 लाख कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याना शून्य टक्के व्याज दरावर कर्ज पुरवठा केला आहे. त्यांनी जर वेळेत कर्ज भरले नाही तर त्यांना शून्य टक्के व्याजाची सूट देता येणार नाही. आमही अजूनही ज्या कर्जमाफीबाबतच्या घोषणा केलेल्या आहेत. त्या घोषणापासून आम्ही पळ काढणार नाही, असा शब्द या निमिताने राज्यातील शेतकऱ्याना मी देत आहोत, असे पवार यांनी म्हंटले.