कुटुंबाने दरवाज्याबाहेर पाय ठेवताच घरात झाला स्फोट; अख्खा परिवार थोडक्यात बचावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : स्वयंपाकघरात चहा बनविताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला व काही वेळातच त्याचा भीषण स्फोट झाला. वेळीच प्रसंगवधान राखल्याने संपूर्ण कुटुंब थोडक्यात बचावले. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संजयनगर मधील गल्ली क्र. बी-4 मध्ये घडली.

प्रणव संजय होंणराव यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरचे सकाळी 8 च्या सुमारास किचनमध्ये गॅसवर काम करीत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. वेळीच प्रसंगवधान राखत घरातील सर्व सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. सर्व सदस्य घराबाहेर जात नाही तोच मोठा आवाज होऊन त्या सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाचे विजय राठोड, रमेश सोनवणे, श्याम बमणे, अब्दुल हमीद सह आदींच्या पथकाने त्वरित घटनस्थळ गाठले मात्र अरुंद गल्ल्यामुळे अग्निशामक दलाचा बंब घटनस्थळा पर्यन्त पोहोचू शकले नाही. त्यामुळे नळीच्या साहाय्याने अथक परिश्रम घेत जावांनी आग आटोक्यात आणली.

या स्फोटामुळे घरातील फ्रीज, भांडे, इलेक्ट्रिक साहित्य असे सुमारे सव्वा लाखाचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment