हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोणत्याही (Lenskart Karad) मोठ्या शहरात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे Lenskart.com हे दुकान दिसेलच. भारतातील सर्वात जास्त चष्मा विकणाऱ्या या कंपनीचा देशात मोठा बोलबाला आहे. पियूष बंसल यांनी 2010 मध्ये सुरु केलेल्या या कंपनीने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळंच आज ही कंपनी 70 लाख ग्राहक आणि 4.5 अब्ज डॉलर किमतीची बनली आहे.
पियूष बंसल यांनी जेव्हा 2010 मध्ये लेन्सकार्ट सुरू केले तेव्हा सुमारे 50% लोकांना चष्म्याची गरज होती, परंतु त्यापैकी फक्त 25% लोकांना प्रत्यक्षात चष्मा उपलब्ध होता. ही पोकळी पियूष बंसल यांना भरून काढायची होती. Lenskart थेट ग्राहकांना उत्पादने पुरवते. शिवाय, 100% अचूकता आणि उच्च दर्जाचे नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी, कंपनीने इन-हाउस रोबोटिक लेन्स निर्मिती आणि असेंबली सुरू केली. Lenskart वरून तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन चष्मा खरेदी करू शकता. तुम्ही जर कराड मध्ये राहत असाल तर खास कराडकरांसाठी लेन्सकार्टने आपलं स्टोअर सुरु केलं आहे.
पत्ता- 469, A1, शनिवार पेठ, तळभाग, पी. जी. शाह पेट्रोल पंपासमोर, कराड, महाराष्ट्र 415110
100% अचूक आणि उच्च दर्जाचे चष्मे – (Lenskart )
कराड येथील लेन्सकार्ट कंपनीच्या स्टोअर मधून तुम्ही अतिशय उच्च दर्जाचे आणि 100% अचूक असे चष्मे खरेदी करू शकता. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवस हे स्टोअर तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. हे स्टोअर आपल्या ग्राहकांना मोफत नेत्रतपासणीची सुविधा देते जी प्रमाणित ऑप्टोमेट्रिस्टद्वारे केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळील सर्वोत्तम ऑप्टिशियन शोधत असाल तर कराड येथील शनिवार पेठ परिसरातील लेन्सकार्ट स्टोअर तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.