हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जंगलातील हिंस्र प्राणी वाघ, सिंह हे नेहमीच अन्य प्राण्यांची शिकार करतात. अनेक वेळा आपण टीव्ही चॅनेल्स वे वाघ – सिंहांनी डुक्कर, हरीण, कोल्हा यांची शिकार केल्याचं पाहिले आहे. पण जर समजा तुम्हाला कोणी म्हंटल की बिबट्या आणि हरीण एकत्रपणे चालत आहेत तर कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. हरणाला बघितलं की वाघ असो किंवा बिबट्या थेट त्याच्यावर तुटून पडणार असच आपण गृहीत धरतो परंतु आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बिबट्या आणि हरीण एकत्र चालताना दिसत आहेत.
ये रिश्ता क्या कहलाता है??? 😅#WrongAnswersOnly. pic.twitter.com/v1EcC8haiB
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 3, 2023
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये एक बिबट्या आणि हरिण रात्रीच्या अंधारात सोबत चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे असं कस काय शक्य आहे असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है??? असा मजेशीर सवाल त्यांनी केला केला. तसेच #WrongAnswersOnly? असा हॅशटॅग सुद्धा त्यांनी दिला आहे.
हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक यूजर्स म्हणतो यातील समोरील नेता आहे आणि पाठीमागील जनता आहे, एकजणाने कमेंट्स केली कि कारण कधी कधी शिकार पण दोस्त होती तर एका यूजर्सने म्हंटल यालाच तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतात.