कराड तालुक्यात 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील विंग येथे 5 वर्षांच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. पंजा मारून त्यास जखमी केले. शिंदेवाडी येथील ओम विजय शिंदे असे जखमी मुलाचे नाव आहे. कुटुंबीय शेतातील उसाची लागण करत असताना शनिवारी दुपारी ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, विंग येथील शेतात उसाची लागण करण्याचे काम सुरू होते. यावेळी 5 वर्षाचा ओम बांधावर बसलेला होता. तेव्हा अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्यामध्ये तो जखमीही झाला आहे. या वेळी कुटुंबीयांचे लक्ष मुलाकडे गेल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून पलायन केल्याने पुढील अनर्थ टळला. त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची घटना विंग-शिंदेवाडी दरम्यान फडके वस्ती नावाच्या शिवारात घडली.

बिबट्याच्या हल्यात मुलाच्या मांडीवर व पाठीवर गांभीर्य ओरखडले आहे. वनरक्षक रमेश जाधवर व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तिकडे लक्ष गेले. त्यांनी तातडीने येऊन भेट देऊन पाहणी केली. मुलास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले आहे. वनविभागाने वरिष्ठांनाही घटनेची माहीती कळविली आहे.

Leave a Comment