शेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील वारणा जलसेतूवरून जाताना अंदाज न आल्याने सुमारे दीडशे फूट उंचीवरून पडल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. खुजगाव- शेडगेवाडी दरम्यान असणाऱ्या जलसेतूवरून जाताना बिबट्या शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पडला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री पूर्ण वाढ झालेला बिबट्या जलसेतूवरून जाताना पडला. त्यावेळेस एका ॲकॅडमीतील काही युवक व्यायामासाठी गेले होते. तेव्हा खिरवडे येथील काळूबाईच्या मंदिराकडील जंगलातून अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे युवकांनी त्या दिशेने धाव घेतली, त्याठिकाणी बिबट्या पडल्याचे दिसल्याने त्यांनी खुजगावात वनकर्मचारी शिवाजी सावंत यांना या घटनेची माहीती दिली. त्यानंतर बॅटरीच्या सहाय्याने बिबट्या पडलेल्या जागेची पाहणी केली असता बिबट्या ठार झालेल्या अवस्थेत आढळून आला. बिबट्याच्या डोक्याला मार लागल्याने तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

सदरच्या घटनेची मिळताच वनविभागाचे अधिकारी वनपाल बी. डी. मुदगे, वनरक्षक मिरजकर, वनरक्षक देवकी तहसीलदार, वनकर्मचारी बाबजी पाटील, लक्ष्मण झोरे, शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी परिसरात माहिती मिळताच लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Leave a Comment