तडफडणाऱ्या बिबट्याचा क्रोनिक न्युमोनियाने मृत्यु : वनविभागाकडून शवविच्छेदन करून दहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील साजूर येथे ऊसाच्या सरीमध्ये बिबटया तडफडत असताना आवाज आल्याने गावातील लोक हातात काट्या घेवून शेताकडे गेले होते. मात्र बिबटया जागेवरच पडून तडफडत होता.  गावकऱ्यांनी प्राणीमित्र रोहित कुलकर्णी यांना फोन लावला, तेव्हा वनविभाग तातडीने घटनास्थळी पोहचेल. परंतु बिबट्याचा मृत्यू झाला होता, बिबट्याच्या फुफुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ 80% संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनियाने मृत्यु झाला असल्याचे वनविभागाने सांगितले.

वनविभागाने दिलेली माहीती अशी, मंगळवार दि. 27 जुलै रोजी कराड वनपरिक्षेत्रातील मौजे साजुर येथील शेतमालक अनिल चव्हाण यांचे गट नं. 367 मध्ये, शेतमालक जनावरांसाठी चारा काढत असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबटया तडफडत असताना आवाज आला. बिबटयाला पाहताच शेतमालक ओरडत घराकडे / गावाकडे पळाले. त्वरीत गावातील काही लोक हातात काटया घेऊन शेताकडे आले. परंतु बिबटया जागेवरच पडून तडफडत होता. तेव्हा काही गावकऱ्यांनी प्राणी मित्रांना फोन लावले. त्यातील प्राणीमित्र रोहीत कुलकर्णी यांनी मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा रोहन भाटे यांना फोन वरुन माहिती दिली. त्यांनी त्वरीत सहा. वनसंरक्षक विलास काळे यांना कळविले. त्वरीत शासकीय वाहनात पिंजरा चढवून वनरक्षक मलकापूर रमेश जाधवर, वनरक्षक कोळे राठोड त्वरीत घटनास्थळाकडे रवाना झाले. तोपर्यत प्राणीमित्र व रोजंनदारी वनमजूर मयुर जाधव- गमेवाडी, रोहीत कुलकर्णी त्वरीत घटनास्थळी हजर होऊन बिबटयाची पाहणी केली. तेव्हा बिबटया जागेवरच तडफडत होता.

थोडयाच वेळात वनअधिकारी व रोहन भाटे जागेवर पोहचले. तेव्हा बिबटया मृत पावला होता. शरीराचे तापमान जास्त होते. त्यास उचलुन कराड येथे पशुधन विकास अधिकारी/तथा सहा. आयुक्त, पशुधन विकास विभाग यांचे दवाखाण्यात आणून शवविच्छेदन केले. बिबट्याच्या फुफुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ 80% संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनियाने बिबट्याचा मृत्यु झाला. कराड वनकार्यालयात सहा. वनसंरक्षक, सातारा व पशुधन विकास अधिकारी यांच्या आदेशाने दहन करण्यात आले. सदर कार्यवाही मध्ये सहा. वनसंरक्षक सातारा विलास काळे, वनक्षेत्रपाल कराड अर्जुन गंबरे, मानद वन्यजीव रक्षक सातारा जिल्हा रोहन भाटे, वनपाल मलकापूर ए. पी. सवाखंडे, वनपाल कोळे बाबुराव कदम, वनरक्षक मलकापूर रमेश जाधवर, वनरक्षक कोळे राठोड, वनरक्षक तांबवे मंगेश वंजारे. आवश्यक कागदपत्रे तयार केली. पंचनामा केला. पुढील तपास चालु आहे.

Leave a Comment