कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील येरवळे विंग परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले असून भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काल रात्री विंग येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या घोरपडे वस्ती मधील अभिजीत घोरपडे यांच्या म्हशीचे नुकतेच जन्माला आलेले रेडकू बिबट्याने खाऊन फस्त केले.
या घटनेची माहिती मिळताच मलकापूर वनपाल आनंद जगताप यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत झालेल्या रेडकाची तशीच परिसराची पाहणी केली. वारंवार पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी नागरिकांकडून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे
बिबट्याचे भर वस्तीत पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वारंवार वाढू लागल्यामुळे संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. येरवळे येथेही दोन दिवसांपूर्वी संतोष यादव यांना उसाच्या फडात बिबट्याने दर्शन दिले होते