औरंगाबाद | जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात गुरुवारी एका व्यक्तीला बिबट्या दिसला होता. त्याने याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या आहे की वाघ याबद्दल सध्या सर्वत्र तर्क वितर्क लावले जात आहेत.
धुळे सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला गुरुवारी सकाळी लेणी परिसरात डोंगरकपारीत बिबट्या दिसला त्याने बिबट्याची मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा बिबट्या खुलताबाद गेस्ट हाउसच्या दिशेने गेल्याची माहिती मिळत आहे. यामुळे वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन, म्हैसमाळ परिसरात भीतीचे वातावरण आहे.
माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक बिबट्याच्या शोधासाठी परिसरात रवाना झाले. हा बिबट्या किंवा याबद्दल तर्कवितर्क असले तरी तो वाघ नसून बिबट्याचा असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. पर्यटक व या परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.