शरीरात अचानक बदल जाणवतायत ? असू शकतात हि कारण , जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । मानवी शरीरातील प्रत्येक क्रिया-प्रक्रियेसाठी शरीराला प्रोटिन्स , विटामिन्स , मिनरल्स यांची आवश्यकता असते. अंडे- डाळी अशा पदार्थांमधून प्रोटिन्स मिळते. तर संत्री – लिंबू अशा फळांमधून ‘सी’ व्हिटॅमिन तर सकाळच्या कोवळ्या उन्हातून ‘डी’ व्हिटॅमिन मिळते. शरीराला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. पाण्यामुळे शरीरातील चयापचय हे सुरळीत चालू राहते. शरीराची प्रत्येक गरज पूर्ण होण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो . पण तरी देखील शरीरात अचानक काही बदल तुम्हाला जाणवत असतील , तर हे बदल तुमच्या शरीराची गरज तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न करत आहेत , हे संकेत कसे ओळखायचे जाणून घ्या ,

एडिमा :
शरीराच्या कोणत्याही अवयवावर जर अचानक सुज आली असेल तर त्यास ‘एडिमा’ असे म्हटले जाते. ही समस्या शरीरात प्रोटीन कमी असल्याचा एक संकेत आहे. म्हणूनच या समस्येकडे जास्तकाळ दुर्लक्ष न करता त्वरित प्रोटीन लेवलची तपासणी करून घ्यावी.

१ . शरीरात जर बीपी कमी होणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. ही शरीरातील अशी अवस्था आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरातील रक्त हे लाल रक्तपेशी बनवण्यामध्ये अयशस्वी ठरतात. परिणामी लाल रक्त पेशींची संख्या कमी होत जाते.

२ . केसांच्या सुदृढ वाढीसाठी प्रोटीनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते . जर तुम्हाला लांबसडक केस हवे असतील तर शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता असते .

३ . जर तुमची जखम बराच काळ बरी होत नसेल , तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा कमी आहे हे समजावे.

४ . जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते, तेव्हा त्यांना हाय प्रोटीन डायट दिला जातो. प्रोटीन शरीराच्या चयापचय प्रक्रियेला तृप्त ठेवतो. त्यामुळे जर भूक वाढत असेल तर शरीरामध्ये प्रोटीनची कमी आहे हे समजावे.

५ . प्रोटीन शरीरात कमी झाले असेल , तर शरीरातील हाडे कमकुवत होत जातात. हाडांच्या स्वास्थ्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक हाय प्रोटीन डाइट घेतात , त्यांच्यामध्ये 70% हाडे कमकुवत होण्याची शक्यता नसते.

६. ज्या लोकांना सामान्य वातावरणातही थंडी वाजते अशा लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते .

Leave a Comment