परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी लोकसभा निवडणुक प्रचाराला काही दिवस शिल्लक राहिलेत त्यात मतदार संघाची व्याती मोठी आहे, तब्बल 19 लाख मतदार,1500 लहान मोठी गावे, 2168 मतदान केंद्रे असल्याने प्रत्यक्ष उमेदवार याठिकाणी कमी कालावधीत पोहचणे अशक्य आहे . त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची फळी तालुका, सर्कल, गाव पातळीवर सक्रीय झालीय.
परभणी जिल्हातील सांस्कृतिक शहर सेलूत राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंगळवार दि .९ एप्रिल रोजी शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ‘ चलो घरघर अभियान सुरु करण्यात आलंय. यासाठी शहरातील साईबाबा बँकेच्या सभागृहात आ . विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीये आयोजन करण्यात आले होते .
पक्षाचे उमेदवार राजेश विटेकरांचा प्रचार 16 एप्रिलपूर्वी घराघरांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहान यावेळी आ . विजय भांबळे यांनी केले . यावेळी हेमंतराव आढळकर, विनायक पावडे, पवन आढळकर, विनोद तरटे, बापु डख, राजेंद्र गाडेकर यांच्यासह नगरसेवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .