राज्यात वाहतंय युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे वारे! कोण करतं मतदान? कशी होते प्रदेशाध्यक्ष पदाची निवड?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या पक्षाच्या युवक संघटनेसोबत काम करण्याकरता गेल्या काही वर्षांपासून थेट निवडणुकीतून निवड करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षात अनेक चेहऱ्यांना संधी मिळाली. सध्या सुरु असलेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदाकरिता बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये शिवराज मोरे, कुणाल नितीन राऊत, शरण बसवराज पाटील, अनिकेत म्हात्रे, विजयसिंह चोधरी हि नावे चर्चेत आहेत. मात्र हि निवडणूक नक्की होते कशी? कोण मतदान करू शकतं? एकंदर निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा हॅलो महाराष्ट्राने घेतलेला विशेष आढावा पाहुयात.

निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक –

साधारण सर्व राजकीय पक्षांच्या युवक आणि विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची निवड हि नियुक्तीद्वारे केली जाते. मात्र युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड हि थेट निवडणुकीद्वारे होते. युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे यंदा चौथी वेळ आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे मतदान प्रक्रियेची हि पहिलीच वेळ आहे.

कोण करू शकते मतदान –

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वच तरुणांना मतदान करता येते. याकरता युवक काँग्रेसचे सभासद असणे अनिवार्य आहे. कोणताही युवा ज्याचे वय १८ ते ३५ वर्षे आहे ते या निवडणुकीत मतदान करू शकतात.

मतदान कसे करावे?

मतदान करण्याकरता आपण युवक काँग्रेसचे सभासद असणे गरजेचे आहे. सभासद नोंदणी करता आपल्या WITH IYC हे aap आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोडकरून घ्यावे. त्यानंतर सभासद नोंदणीकरता ५० रुपये इतकी नोंदणी फी भरावी. यावेळी तुम्हाला तुमचे ओळखपत्राची एक प्रत अपलोड करून तुमचा स्वतःचा माहितीबाबतचा एक व्हिडीओ ऍप वर अपलोड करावयाचा आहे. सभासद नोंदणीची प्रक्रिया झाल्यांनतर तुम्ही मतदानास पात्र होता. यानंतर तुम्हाला एकूण चार मते द्यायची आहेत. तुमच्या विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष (तालुकाध्यक्ष), लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष (जिल्हाध्यक्ष), राज्य सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष यानुसार तुम्हाला तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे.

निकाल कसा लागतो?

युवक काँग्रेसची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हि WITH IYC हे aap च्या माध्यमातून होते. याची मतमोजणी दिल्ली येथून एका स्वतंत्र टीमकडून करण्यात येते. विशेषबाब म्हणजे विधानसभा, लोकसभा यांच्या आरक्षणानुसार स्थानिक स्तरावरही पदाकरिता आरक्षण असते. मतमोजणी झाल्यानंतर सदर मतदारसंघात सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित केले जाते. प्रदेशाध्यक्ष पदाकरताही सर्वाधिक मताधिक्य असलेला उमेदवार विजयी होतो. मात्र राज्य सरचिटणीस पदाकरिता ज्या उमेदवारांना विजयी झालेल्या प्रदेशाध्यक्ष उमेदवाराच्या एकूण मतांच्या ३० टक्के मते मिळाली आहेत त्या सर्वांना विजयी मानले जाते.

Leave a Comment