दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे.

महाराष्ट्रात १५१ तालुक्यामध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तर केंद्र सरकारने ४हजार ७१४ कोटी रुपयांची भरीव मदत दुष्काळग्रस्तांसाठी राज्य शासनाला वर्ग केली आहे. या निधीच्या वाटपासाठी आणि दुष्काळावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक देखील घेण्याची अवश्यकत आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.

महाराष्ट्रात निवडणूक संपली असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला असे पत्र लिहले आहे. त्याच प्रमाणे १९ मे रोजी  देशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. तोपर्यत संपूर्ण देशात आचारसंहिता अस्तित्वात असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळी कामांना मदत देता येणार नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला लिहले आहे.

Leave a Comment