LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आपल्याला तीन प्रकारचे फायदे मिळतात. यातील पहिला म्हणजे करमाफीचा लाभ, दुसरा चांगला रिटर्न आणि तिसरा म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण. ते LIC कडे अशा 3 विमा पॉलिसी आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून आपण आयुष्यभर टेन्शन फ्री राहू शकाल.

LIC May Look At Composite Licence After Passage Of Insurance Laws  (Amendment) Bill

एलआयसीच्या पॉलिसीद्वारे लहान मूल आणि वृद्धांनाही गुंतवणुकीची संधी दिली जाते. यापैकी एक पॉलिसी तर इतकी लोकप्रिय झाली की, या पॉलिसीच्या लॉचिंगनंतर काही वेळातच 50 हजारांहून जास्त लोकांनी ती खरेदी केली. या पॉलिसीचे नाव आहे एलआयसी नवीन जीवन आनंद, एलआयसी जीवन उमंग आणि चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन. या तिन्ही पॉलिसीद्वारे गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह गॅरेंटेड रिटर्न मिळतो.

LIC New Childrens Money Back Plan Features Benefits Invest 150 rupess every  day for your child future | LIC Children's Money Back Plan : बच्चों के लिए  एलआईसी का ये खास प्लान,

न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन

एलआयसीचा हा प्लॅन खास मुलांसाठी बनवला गेला आहे. या पॉलिसीद्वारे मुलांना आर्थिक सुरक्षा मिळते. यामध्ये अर्जाचे वय 0 ते 12 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, या योजनेतील मॅच्युरिटीचे वय 25 वर्षांपर्यंत आहे.

LIC की बेस्ट पॉलिसी! सालाना 27 हजार जमा करने पर मिलेंगे 10 लाख रुपये –  News18 हिंदी

न्यू जीवन आनंद

न्यू जीवन आनंद पॉलिसी ही LIC ची एक जबरदस्त योजना आहे. यामध्ये अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. या योजनेमधील गुंतवणुकीवर चांगला रिटर्न देखील मिळतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय 18-50 वर्षे असावे. तसेच या योजनेतील मॅच्युरिटीचे वय 75 वर्षे आहे. यामध्ये गुंतवणूक केल्‍याने सम एश्युअर्डची सुविधा देखील मिळते. यासोबतच कर सवलतीचाही लाभही मिळतो. याशिवाय यामध्ये पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

Features And Benefits Of LIC Jeevan Umang Money Back Plan

जीवन उमंग

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये चांगला रिटर्न मिळतो. तसेच यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 90 दिवस ते 55 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये कर सवलतीचा लाभही मिळतो. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. याअंतर्गत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सर्व पैसे मिळतील. या पॉलिसीमध्ये 2 लाख रुपयांची विमा रक्कम देखील मिळते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang

हे पण वाचा :
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात खालच्या पातळीवरून सुधारणा, जाणून घ्या आजचे दर