हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात पैशाची अडचण पडू नये म्हणून (LIC Aadhaar Shila policy) आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे भर देतो. तुम्ही सुद्धा आपल्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक करणार असेल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका खास योजनेबाबत सांगणार आहोत. एलआईसी आधार शिला स्कीम असं या योजनेचं नाव असून खास महिलांसाठी ही योजना आहे. या स्कीम मध्ये रोज 58 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. देशातील अनेक महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करत आहेत.
LIC ची आधार शिला पॉलिसी ही एक नॉन-लिंक केलेली, वैयक्तिक, जीवन विमा योजना आहे. यामध्ये पैशाच्या सुरक्षिततेसह बचत देखील होते. या योजनेत पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य आणि मुदतपूर्तीच्या वेळी एकरकमी रक्कम दिली जाते. तसेच तुम्हाला कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. या पॉलिसीची मुदत कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षे आहे. 8 ते 55 वयोगटातील महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत मूळ विमा रक्कम कमीत कमी 75 हजार रुपये आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपये आहे. या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास. या परिस्थितीत, कुटुंबाला मैच्योरिटीच्या वेळी लॉयल्टी जोडण्याची सुविधा मिळते.
समजा, या योजनेत तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी दररोज 58 रुपये वाचवून 20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या वर्षी एकूण 21,918 रुपये जमा केले जातील. यावर तुम्हाला एकूण 4.5% कर देखील भरावा लागेल. यानंतर, तुम्हाला दुसऱ्या वर्षी या योजनेत 21,446 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत तुम्ही तुमचा प्रीमियम महिने, तीन महिने, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरू शकता. प्रीमियम भरल्यानंतर, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 7,94,000 रुपये मिळू शकतात.