हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. या विमा कंपनीने सर्वसामान्य लोकांना श्रीमंत बनवण्याच्या अनेक योजना कार्यरत केल्या आहेत. LIC च्या या योजनांमध्ये सामील होऊन ग्राहक जास्त उत्पन्न मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामाध्यमातून तुम्ही दररोज फक्त 87 रुपयांची गुंतवणूक करून ११ लाख रुपयांचा फंड जमा करू शकता. ही योजना नेमकी काय आहे?? आणि कशाप्रकारे तुम्हाला लाभ मिळेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एलआयसीच्या या योजनेचं नाव आधार शिला योजना (LIC Aadhar shila plan) असे असून खास करून महिलांसाठी ही योजना आणली आहे. भारतातील सर्वात मोठ्या विश्वासार्ह योजनांमध्ये या योजनेचा प्रामुख्याने समावेश आहे. ही योजना महिलांना लक्ष्य ठेवून कार्यरत केली आहे. या योजनेत महिलांनी गुंतवणूक करून श्रीमंत व्हावे अशी योजना आहे. ज्या महिलांचे श्रीमंत व्हायचे स्वप्न आहे, त्या महिलांना एलआयसीच्या या योजनेत छोटी रक्कम गुंतवून त्याचा परतावा अधिक मिळू शकतो.
एलआयसीची ‘आधार शिला योजना’ ही एक नॉन-लिंक्ड वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या योजनेमुळे महिलांचे आयुष्य बदलले आहे. या योजनेमध्ये महिलांनी छोटी गुंतवणूक करण्याची अपेक्षा आहे. या योजनेत मुदत संपण्यापूर्वी खात्रीने परतावा मिळतो, एवढी विश्वासार्ह ही योजना आहे. मासिक हप्ते भरत या योजनेत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. या योजनेत सर्व हप्ते भरले की, बंपर परतावा मिळण्याची सोय उपलब्ध आहे. महिला दररोज 87 रुपये बचत करून या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
वार्षिक गुंतवणूक किती ?
महिलांसाठी एलआयसीची ‘आधार शिला योजना’ खऱ्या अर्थाने आधार ठरेल. महिलांनी या योजनेत एलआयसीमध्ये दररोज 87 रुपये गुंतवण्याची अपेक्षा आहे. दररोज 87 रुपये प्रमाणे दरवर्षी या योजनेत 31755 रुपयांची गुंतवणूक जमा होते. अशा प्रकारे, या योजनेत महिलांनी 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर जमा झालेली एकूण रक्कम 3,17,550 रुपये होणार आहे. यानंतर, एलआयसी पॉलिसीधारकाचे वय 70 वर्षे पूर्ण झाल्यावर, त्याला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 11 लाख रुपये मिळू शकतील. जर या कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण रक्कम वारसाला देण्याची एलआयसीने सोय केली आहे.