LIC Amritbaal Policy । तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने लहान मुलांसाठी विशेष अशी विमा योजना आली आहे. ‘एलआयसी अमृतबल असे या योजनेचं नाव असून यामध्ये लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यास ते मोठी होईपर्यंत मोठा आर्थिक लाभ मिळेल. ही योजना विशेषतः मुलाच्या उच्च शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड देण्यासाठी तयार केली गेली आहे. आज आपण या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेत, एलआयसी 1000 विम्याच्या रकमेसाठी 80 रुपयांच्या प्रमाणात हमी परतावा देते. यामधील खास गोष्ट म्हणजे 80 रुपयांचा हा परतावा विमा पॉलिसीच्या विम्याच्या रकमेमध्ये जोडला जातो. समजा, जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर 1 लाख रुपयांचा विमा काढला तर LIC तुमच्या विम्याच्या रकमेत 8000 रुपयांच्या हमीची रक्कम जमा करेल. हा हमी परतावा प्रत्येक वर्षी पॉलिसी वर्षाच्या शेवटी जोडला जाईल आणि संपूर्ण पॉलिसी मुदत संपेपर्यंत चालू राहील.
पॉलिसीसाठी वयाची पात्रता काय असावी? LIC Amritbaal Policy
‘एलआयसी अमृतबल योजना ही पॉलिसी 30 दिवसांपासून ते 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी घेतली जाऊ शकते. या पॉलिसीचे कमीत कमी मॅच्युरिटी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. या पॉलिसीसाठी 5, 6 किंवा 7 वर्षांच्या शॉर्ट टर्म प्रीमियम पेमेंट अटी उपलब्ध आहेत. तर जास्तीत जास्त प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे आहे. तुम्हाला सिंगल प्रीमियम पेमेंट पर्याय निवडायचा असल्यास, तुम्ही तो देखील निवडू शकता. परंतु या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल. तुम्ही 5व्या, 10व्या किंवा 15व्या वर्षी मनी बॅक प्लॅनप्रमाणे मॅच्युरिटी सेटलमेंट घेऊ शकता.
भारतीय जीवन बीमा निगम ने एक नई योजना पेश की है: एलआईसी का अमृतबाल#LIC #AMRITBAAL pic.twitter.com/A7GBJduwFW
— LIC India Forever (@LICIndiaForever) February 16, 2024
या पॉलिसीमध्ये (LIC Amritbaal Policy) पैसे गुंतवणाऱ्यांना मुदतपूर्तीवर विमा रक्कम आणि हमी लाभ मिळेल. पॉलिसी खरेदीदारांसाठी ‘सम ॲश्युअर्ड ऑन डेथ’ पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही थोडा जास्तीचा प्रीमियम भरल्यास, तुम्ही खर्चाच्या तुलनेत प्रीमियम रिटर्न रायडरचा लाभ घेऊ शकता.