हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी मानली जाते. एलआयसीकडून देशातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी अनेक प्रकारचे फायदे देणारे इन्शुरन्स प्लॅन लाँच केले जातात. याद्वारे ते खरेदी करणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे भविष्य एकी प्रकारे सुरक्षित होण्यास मदतच होते. तर LIC ची Bima Ratna Scheme देखील अशा योजनांपैकीच एक आहे, ज्यामध्ये अनेक फायदे मिळतात.
या योजनेबाबत जाणून घ्या
LIC च्या विमा रत्न योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना मनी-बॅक गॅरेंटी, रिच बोनस आणि डेथ कव्हर असे तीन प्रकारचे फायदे दिले जातात. या पॉलिसीची मुदत 15 वर्षे असून यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या एकूण डिपॉझिट रकमेच्या 10 पट रक्कम मिळू शकेल.
मॅच्युरिटीवर किती रिटर्न मिळेल ???
या पॉलिसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी पॉलिसीच्या 13व्या आणि 14व्या वर्षात 25 टक्के रिटर्न मिळतो. त्याचप्रमाणे, 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी, 18व्या आणि 19व्या वर्षात गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 25 टक्के रिटर्न मिळतो. तसेच 25 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी, पॉलिसीच्या 23व्या आणि 24व्या वर्षात रिटर्न मिळतो. यामध्ये पहिल्या पाच वर्षांसाठी प्रत्येक 1000 रुपयांवर 50 रुपयांचा बोनस देखील मिळतो, जो 6-10 वर्षांच्या दरम्यान 55 रुपयांपर्यंत तर शेवटी मॅच्युरिटीनुसार 60 रुपयांपर्यंत वाढतो.
कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ???
या योजनेचा लाभ कमीत कमी 90 दिवस वय असलेले मूल आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तींना घेता येईल. यामध्ये कमीत कमी 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिकरित्या पेमेंटची सुविधा मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Bima-Ratna-(Plan-No-864,-UIN-No-512N345V01)
हे पण वाचा :
कोरोना नंतर आता देशात H3N2 विषाणूचा धोका, कर्नाटक-हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू
तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
Gold Price Today : सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली, तपासा आजची किंमत