LIC Dhan Sanchay Policy मध्ये गॅरेंटेड उत्पन्नासहीत मिळवा जबरदस्त फायदे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC Dhan Sanchay Policy : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. लोकांच्या गरज लक्षात घेऊन एलआयसी वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी अनेक नवीन पॉलिसी आणत असते. ज्यामुळे देशभरातील लाखो लोकं आजही विम्यासाठी LIC लाच पहिली पसंती देतात. तर आज आपण LIC Dhan Sanchay Policy बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये, गॅरेंटेड रिटर्न सहीत अनेक जबरदस्त फायदे देखील मिळतात.

New LIC Dhan Sanchay Policy : एलआईसी ने लॉन्च की एक और जबरदस

हे जाणून घ्या कि,LIC Dhan Sanchay Policy हा नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, इंडिव्यूजुअल सेव्हिंग लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे. याद्वारे बचतीबरोबरच लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुविधा देखील मिळते. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. हे मुदतपूर्तीच्या तारखेपासून पेआउट कालावधी दरम्यान गॅरेंटेड उत्पन्न देते. तसेच या गॅरेंटेड उत्पन्न लाभाच्या शेवटच्या हप्त्याबरोबर गॅरेंटेड टर्मिनल लाभ देखील मिळतो.

LIC Dhan Sanchay Policy चा कालावधी किती ???

या पॉलिसीमध्ये 5 ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवता येतील. यामध्ये पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा देखील मिळते. यासोबत अतिरिक्त पैसे देऊन रायडर्सचा लाभ देखील घेऊ येईल.

Post Office Scheme: Double your money with Kisan Vikas Patra in few years,  check process | Personal Finance News | Zee News

गुंतवणूकीसाठी 4 पर्याय उपलब्ध

या पॉलिसीमध्ये 4 पर्याय दिले गेले आहेत. यामधील प्लॅन A आणि B अंतर्गत 3,30,000 रुपयांची विमा रक्कम, प्लॅन C अंतर्गत 2,50,000 रुपयांची विमा रक्कम आणि योजना D अंतर्गत 22,00,000 रुपयांची विमा रक्कम दिली जाते.

किमान वय किती लागेल ???

ही पॉलिसी घेण्यासाठीचे किमान वय 3 वर्षे असावे. त्याच वेळी, कमाल वयोमर्यादा प्लॅननुसार बदलते. यामधील प्लॅन A आणि B साठी कमाल वय 50 वर्षे, प्लॅन C ​​साठी 65 वर्षे आणि D साठी 40 वर्षे आहे.

Dhan Sanchay: एलआईसी ने शुरू की ये नई पॉलिसी, एक बार के खर्च में गारंटी के  साथ होगी रेगुलर कमाई | lic dhan sanchay plan for guaranteed income with  maturity and death

जितक्या वर्षे प्रीमियम भराल तितकी वर्ष मिळेल उत्पन्न

LIC Dhan Sanchay Policy 5, 10 आणि 15 वर्षांसाठी खरेदी करता येईल. यामध्ये जितक्या वर्षांसाठी प्रीमियम भरला जाईल, यानंतर तितक्याच वर्षांपर्यंत उत्पन्न मिळेल. या पॉलिसी अंतर्गत किमान प्रीमियम वार्षिक 30,000 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Dhan-Sanchay-(Plan-No-865,-UIN-512N346V01)

हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
Bank Holiday : फेब्रुवारीमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, अशा प्रकारे तपासा बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स