कराड | देशातील सर्वात मोठ्या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणामुळे विमा प्रतिनिधींसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जीवन विमा महामंडळ विमा प्रतिनिधी पश्चिम विभाग संघटनेने आंदोलनची हाक दिली आहे. त्यानुसार आज 5 सप्टेंबर रोजी कराड येथे एकही विमा प्रतिनिधींने विमा कार्यालयाचे, उपकार्यालयाची पायरी न चढता काम बंद आंदोलन केले. कराड येथील विमा प्रतिनिधी काळ्या फिती बांधत निषेध व्यक्त केला.
पॉलिसीधारकांच्या बोनसमध्ये वाढ करा, पॉलिसी कर्ज व अन्य वित्तीय व्यवहारावरील व्याजात कपात करा. विमाधारकांना चांगली सेवा द्या, 5 वर्षांवरील पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची मुभा द्या. पॉलीसीधारकांनी न दिलेल्या रकमेस सामाजिक सुरक्षा योजनेत हस्तांतर करु नये. एकाच पॉलिसीधारकाच्या वारंवार व्यवहार करण्यासाठी केवायसी दस्तावेज बंधनकारक करु नये. विमा पॉलिसीवरील जीएसटी काढून टाका, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युईटीची रक्कम 20 लाखापर्यंत वाढवा, विमा प्रतिनिधींचे कमिशन वाढवा. सर्व विमा प्रतिनिधींना समूह आरोग्य विमा योजना लागू करा, विमा प्रतिनिधींना अंशदायी भविष्य निर्वाह निधी लागू करा. विमा प्रतिनिधींना अंशदायी पेन्शन लागू करा, विमा प्रतिनिधींच्या टर्म विमा वाढवून द्या, विमा प्रतिनिधींच्या क्लब नियम व एडवान्स योजनेत दुरुस्ती करा. मुलांना शिक्षण कर्ज उपलब्ध करा, क्लब सदस्यांसाठी गृह कर्ज 5 टक्क्यांनी द्यावे, विमा प्रतिनिधींच्या परिवारासाठी कल्याण निधी तयार करा, विमा प्रतिनिधींना सरकारने व्यावसायिक दर्जा द्यावा आदी मागण्यांबाबत केंद्र सरकार व भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करुनही दाद न दिल्याने अखिल भारतीय स्तरावर विमा प्रतिनिधींनी आंदोलन पुकारले.
आंदोलनांतर्गत 1 सप्टेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत विविध प्रकारचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वप्रेरणादायी, बैठक आणि प्रशासनासोबत कोणत्याही बैठकीस विमा प्रतिनिधी हजर राहणार नाहीत. 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात येणार आहे. सर्व क्लब सदस्य आंदोलन काळात काळ्या फिती लावल्या होत्या.