LIC | एलआयसी ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास झालेली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे नाव आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100/ 2024 यांच्या अहवालानुसार आता एलआयसीचे ब्रँड मूल्य आहे 9.8 मिलियन डॉलरवर स्थिर झालेले आहे.
एलआयसी हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे. आता एलआयसीनंतर (LIC) कॅथेलाइफ इन्शुरन्स हा दोन नंबरचा ब्रँड आहे. परंतु 4.9 अब्ज डॉलर एवढे झालेले आहे. त्यानंतर येणार NRMA हा विमा ब्रँड देखील आहे. या ब्रँडचे मूल्य ८२ टक्क्यांनी वाढून 1.3 अब्ज डॉलर एवढे झालेले आहे.
चीनचा विमा ब्रँड देखील जागतिक क्रमवारीत पुढे आलेला आहे. त्यांनी त्यांचे स्थान टिकून ठेवलेले आहेत. यांचे मूल्य 4 टक्क्यांनी वाढवून 33.6 अब्ज डॉलरपर्यंत गेलेले आहे. यानंतर चायना लाईफ इन्शुरन्स आणि CPIC हे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
एलआयसीचे 39, 090 कोटी रुपयांचे प्रीमियम कलेक्शन
एलआयसीने आर्थिक वर्ष 2022-23 यामध्ये सर्वात जास्त प्रीमियम कलेक्शन साध्य केलेला आहे. त्यांनी या वर्षात सर्वाधिक म्हणजे 39,090 कोटी रुपयांचे प्रीमियम कलेक्शन साध्य केलेले आहे. त्याचप्रमाणे एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांनी 15,197 कोटी रुपये आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांनी 10,970 कोटीचे नवीन प्रीमियम कलेक्शन केलेले आहे.
एलआयसीचे शेअर्स उच्चांकावर | LIC
सरकारने 2022 पासून एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी 17 टक्के वेतन सुधारणेला देखील मंजुरी दिलेली होती. ज्यामुळे 1,10,000 यांच्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला आहे 1175 रुपयांचा यामध्ये उच्चांक गाठला. ज्यामुळे भारतातील सर्वात मौल्यवान सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ही कंपनी बनलेली आहे.
एलआयसीचे नेटवर्क
एलआयसी ही सर्वात मोठी विभाग कंपनी आहे एलआयसी चे 2048 शाखा कार्यालय आहे. त्याचप्रमाणे 113 विभागीय कार्यालय आहेत. 8 क्षेत्रीय कार्यालयात तर 1381 सॅटेलाईट कार्यालय आहे. आणि एवढ्यसोबत ते यशस्वीरित्या आज व्यवसाय करत आहेत.