हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या गुंतवणूकदारांसाठी सतत विविध योजना ऑफर करत असते. यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे ती म्हणजे LIC ची जीवन अक्षय पॉलिसी योजना. (Jeevan Akshay Policy) या योजनेअंतर्गत दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळते. त्यामुळे उतरत्या वयात व्यक्तीला बाहेर जाऊन काम करण्याची गरज पडत नाही. आजवर या योजनेचा अनेक लोकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळेच ही योजना नेमकी काय आहे? तिचे फायदे काय? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जीवन अक्षय पॉलिसी (Jeevan Akshay Policy)
सध्याच्या घडीला तुम्ही जर एलआयसीची अशी योजना शोधत असाल जात कमी गुंतवणूक करून अधिक परतावा मिळेल, तर ही बातमी सविस्तर वाचा. कारण की, आज आपण एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसी योजनेविषयी माहित करून घेणार आहोत. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित बनवू शकता. तसेच या पॉलिसीमुळे तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहावे लागणार नाही.
लक्षात घ्या की एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. LIC च्या या पॉलिसीमध्ये तुम्ही जर 40,72,000 रुपयांची एकर कमी गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा सुमारे 20 हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो. खास म्हणजे, ही योजना एकल आणि संयुक्त विमा पॉलिसींसाठी 10 वर्षांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर पेन्शन मिळताना मासिक प्रीमियम भरण्याची गरज पडणार नाही.
या पॉलिसीमध्ये दरमहा पेन्शन मिळविण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला LIC ची ही पॉलिसी सिंगल किंवा जॉइंट फॉर्ममध्ये खरेदी करण्याची सुविधा ही दिली जाते. पॉलिसी जारी केल्याच्या तीन महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीद्वारे मासिक, तिमाही आधारावर, सहामाही आधारावर किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळवू शकता. महत्वाचे म्हणजे, जर एका 45 वर्षीय व्यक्तीने ही पॉलिसी विकत घेतली आणि यात 70,00,000 रुपयांचा विमा पर्याय निवडला तर त्याला 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. ज्यामुळे त्या व्यक्तीला दरमहा 36,429 रुपये पेन्शन मिळेल.