LIC Scheme: कमी कमाई असणाऱ्यांसाठी ‘ही’ बचत वीमा योजना महत्वाची; केवळ २८ रुपयांत मिळतायत अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसीच्या मायक्रो बचत इन्शुरन्स पॉलिसीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खूपच उपयोगी आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी एलआयसीची हि मायक्रो विमा योजना खूप फायदेशीर आहे. हे प्रोटेक्शन आणि सेव्हिंग यांचे कॉम्बीनेशन आहे. या योजनेमुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला फाइनान्शिअल सपोर्ट मिळेल. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकरकमी पैसे मिळतील. चला तर मग या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊयात…

(१) कर्ज सुविधा उपलब्ध असेल – मायक्रो सेव्हिंग नावाच्या रेग्युलर प्रीमियमवाल्या या योजनेत बरेच फीचर्स आहेत. या विमा योजनेत ५० हजार ते २ लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध असेल. ही एक नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत लॉयल्टीचा फायदादेखील या पॉलिसीमध्ये मिळेल. जर एखाद्याने ३ वर्षांपर्यंत प्रीमियम दिला असेल तर त्याला या मायक्रो बचत योजनेत कर्जाची सुविधा देखील मिळेल.

(२) कोण घेऊ शकते ही योजना ? – हा विमा केवळ १८ ते ५५ वर्षे वयोगटातील सर्व लोकांसाठी उपलब्ध असेल. या अंतर्गत कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असणार नाही. जर कोणी ३ वर्ष सातत्याने प्रीमियम भरला आणि त्या नंतर जर तो प्रीमियम भरण्यास असमर्थ असेल तर पुढील ६ महिने त्याची ही विम्याची सुविधा सुरूच राहील. हा प्रीमियम पॉलिसी होल्डरने ५ वर्ष भरला तर त्याला २ वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल. या योजनेची संख्या ८५१ आहे.

(३) पॉलिसीची मुदत किती असेल? – या मायक्रो बचत विमा योजनेच्या पॉलिसीची मुदत ही १० ते १५ वर्षे असेल. या योजनेत वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक तत्वावर प्रीमियम भरला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला एलआयसीमध्ये अ‍ॅक्सीडेंटल रायडर देखील जोडण्याची सुविधा मिळेल. मात्र, यासाठी आपल्याला एक वेगळा प्रीमियम भरावा लागेल.

(४) दिवसाला २८ रुपयांमध्ये मिळेल २ लाखांचा विमा – याअंतर्गत एखादी १८ वर्षांची व्यक्ती जर १५ वर्षाची योजना घेत असेल तर त्याला प्रति हजार ५१.५ रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याचबरोबर, २५ वर्ष वय असलेल्यांसाठी त्याच कालावधीसाठी ५१.६० रुपये पडतील आणि ३५ वर्ष असल्यासाठी प्रति हजार रुपये ५२.२० रुपये प्रीमियम भरावा लागेल. १० वर्षांच्या योजनेतील प्रीमियम ८५.४५ ते ९१.९ रुपये प्रति हजार असेल. या प्रीमियममध्ये २ टक्के सूटदेखील असेल. जर आपल्याला खरेदी केल्यानंतर हा विमा आवडला नसेल तर आपण १५ दिवसांच्या आत ही योजना सरेंडर करू शकता. जर ३५ वर्षांची व्यक्ती १ लाख रुपयांच्या रकमेसह १५ वर्षाची पॉलिसी घेत असेल तर त्याचे वार्षिक प्रीमियम ५११६ रुपये होईल. सध्याच्या पॉलिसीमध्ये ७० टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध असेल. त्याच वेळी, पेड पॉलिसीमध्ये ६० टक्के रक्कमेच्या कर्जासाठी पात्र असेल.

(५) हे आहे गणित – जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३५ व्या वर्षी पुढील १५ वर्षे ही पॉलिसी घेतली असेल तर त्याला वर्षाकाठी ५२.२० रुपये (विम्याच्या रकमेवर १ हजार रुपये) प्रीमियम भरावा लागेल. त्याचप्रमाणे, जर कोणी २ लाख रुपये विम्याची रक्कम घेतली तर त्याला ५२.२० x १०० x २ म्हणजेच १०,३०० रुपये वार्षिक जमा करावे लागतील. म्हणजेच तुम्हाला दिवसाला २८ रुपये आणि दरमहा ८४० रुपये प्रीमियम भरावा लागतो.

(६) कलम ८०C सी अंतर्गत प्रीमियम पेमेंटवर सूट दिली जाईल – या दरम्यान कर्जावर १०.४२ टक्के व्याज द्यावे लागेल. प्रीमियम भरण्यासाठी १ महिन्याची सूट दिली जाईल. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी जास्ती जास्त ७० वर्षे इतका असेल. ही एक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रीमियमच्या पेमेंटवर कलम ८०C सी अंतर्गत आयकरात सूट मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment