संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी LIC ची खास योजना, प्रीमियमवर महिलांना मिळणार सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास इन्शुरन्स पॉलिसी लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये विमाधारकाला त्याने भरलेल्या प्रीमियमच्या 1000 पट विमा रकमेचा लाभ दिला जातो. म्हणजेच जर आपण 1 रुपयांचा प्रीमियम भरला असेल तर 1000 रुपयांचे इन्शुरन्स कव्हर उपलब्ध होईल. LIC च्या या पॉलिसीचे नाव टेक-टर्म 954 असे आहे. या पॉलिसीमध्ये, कंपनीकडून विमाधारक आणि त्याच्या कुटुंबाला 5000 रुपयांच्या प्रीमियमवर 50 लाख रुपयांचे संपूर्ण इन्शुरन्स कव्हर दिले जाते.

हा एक हाय रिस्क लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे. ज्याअंतर्गत या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जर एखाद्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा दिली जाते. एलआयसीच्या टेक टर्म प्लॅनमध्ये दोन लाभ पर्याय उपलब्ध आहे. यामधील पहिला लेव्हल सम एश्युअर्ड आणि इंक्रीझिंग सम एश्युअर्ड.

LIC TECH TERM Plan 954 : मात्र 5 हजार रुपये में 50 लाख का बीमा! LIC का यह  बेहतरीन प्लान बटोर रही है सुर्खियां, महिलाओं को प्रीमियम में बंपर पर छूट

या टेक टर्म प्लॅनची ​​वैशिष्ट्ये जाणून घ्या

एलआयसीच्या टेक टर्म प्लॅनमध्ये, पॉलिसीधारकाला एकरकमी, नियमित प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट यांपैकी एक पर्याय निवडता येईल.
तसेच या योजनेंतर्गत, पॉलिसी धारकाला हप्त्यांमध्ये फायदे देण्‍याचा पर्याय निवडता येईल.
या योजनेमध्ये, पॉलिसी धारकाला काही अतिरिक्त प्रीमियम भरून ऍक्सिडेंटल रायडरची निवड करून आपल्या पॉलिसीचे कव्हरेज वाढवता येईल.
या योजनेमधील प्रवेश करण्यासाठीचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 65 वर्षे आहे तसेच मॅच्युरिटीचे वय 80 वर्षे ठेवण्यात आले आहे.
या प्लॅनमध्ये किमान विमा रक्कम 50 लाख असेल तर जास्तीच्या विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नसेल.
तसेच या योजनेच्या पॉलिसीची मुदत 10 ते 40 वर्षे असेल.
या योजनेंतर्गत जोखीम सुरू झाल्यानंतर मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाच्या मृत्यूवर डेथ बेनिफिट दिला जातो. तसेच हा टर्म प्लॅन
असल्याने या पॉलिसीच्या मुदतपूर्तीपर्यंत विमाधारकाच्या जिवंतपणी कोणताही लाभ दिला जाणार नाही.
या योजनेमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर दोन प्रकारे डेथ बेनिफिट उपलब्ध असतील. यामध्ये कुटुंबाला एकरकमी रक्कम दिली जाईल किंवा विम्याची रक्कम हप्त्यांमध्ये घेता येईल.

LIC Tech Term Plan: ५ हजार रुपयांत ५० लाखांचा बीमा, संपूर्ण परिवाराच्या  सुरक्षिततेसाठी LIC चा खास प्लॅन

महिलांना प्रीमियमवर मिळेल खास सवलत

LIC च्या या प्लॅनमध्ये महिलांना प्रीमियमवर खास सूट देखील दिली जाते. त्याच वेळी, धूम्रपान न करणाऱ्या ग्राहकांनाही या प्लॅनच्या प्रीमियममध्ये सूट दिली जाते. एलआयसीच्या प्लॅन नंबर 954 मध्ये, धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगळे प्रीमियम दर आणि धूम्रपान करणाऱ्यांसाठी वेगळे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत. हे जाणून घ्या कि, एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा टेक टर्म प्लॅन खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LICsTECH-TERM

हे पण वाचा :
Yes Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, जाणून घ्या ग्राहकांना किती फायदा मिळणार
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हात ‘हा’ छोटासा fridge भागवेल आपली तहान !!!
Jio ने आणला 11 महिन्यांसाठीचा जबरदस्त प्लॅन, 900 रुपयांपेक्षा कमी पैशांत मिळवा ‘हे’ फायदे
New Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे कमी खर्चात मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न