अमरावती प्रतिनिधी / अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालूकाक्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालूक्यात काल सांयंकाळी अचानक वादळी वार्यासह पाऊस आल्याने नागरीकांची अचानक तारांबळ ऊडाली होती.
अचानक आलेल्या पावसाने लोकांना साधारण अर्धा तासभर वाहने रस्ताच्या कडेला लावून थांबावे लागले. शेताची सुगी चालू असल्याने पिकांचे मात्र या पावसामुळे मोठे नुकसान झाले. तसेच आंबांना आलेला मोहर अवकाळी पावसामुळे गाळून पडला आहे.
काही ठीकाणी शेतात असणार्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. तर आंबा या पिकाला ही या अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. मात्र भर ऊन्हाळ्यात एकाएकी आलेल्या पावसाने मातीचा सूगंध मात्र मन प्रफुल्लित करीत होता.
इतर महत्वाचे –
संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त निघाली मूक पदयात्रा
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा जिल्ह्यात हायटेक प्रचार
लागीर झालं जी या मालिकेतील कलाकारांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक.