Lightening In Rain | तुळजापूरमध्ये वीज पडून शेतातून निघाले निळे पाणी; भूगर्भशास्त्रज्ञांना केली पाण्याची चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lightening In Rain | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. परंतु मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यातील कशी विचित्र घटना घडलेली आहे. ती म्हणजे मसला गावच्या एका शेतात वीज पडल्यानंतर(Lightening In Rain) त्या शेतातील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागलेले आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आणि याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना दिसत आहे.

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहत आहे. हे पाणी इतके गडद निळे आहे की, ते एका कृत्रिम रंगासारखे दिसते. या ठिकाणी तुम्ही विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. आणि अचानक वीज जमिनीवर (Lightening In Rain) कोसळली. त्यांनतर त्या जमिनीतून निळे पाणी वाहू लागले. परंतु यातून निळे पाणी कसे काय आले? याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालू झालेला आहे. यावेळी भूगर्भशास्त्रज्ञांना देखील बोलवण्यात आले आणि पाण्याची चाचणी घेण्यात आली.

मराठवाड्यात जोरदार पावसाने हजारी लावलेली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सुरू झालेली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागलेले आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पुढे एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे
जायकवाडी धरणात तब्बल एक टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.

संभाजीनगरमध्ये देखील मान्सूनचे आगमन झालेले आहे सहा तासात 57.8 मीमी पाऊस झालेला आहे. त्याचप्रमाणे नांदेड, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील पावसाचे हजेरी लावलेली आहे.