लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी सगळीकडे लॉकडाउन उठवण्यापेक्षा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना व्हायरसचे रुग्ण आहेत तेथे मर्यादित स्वरूपात लॉकडाउन सुरू ठेवण्याचा विचार सरकार करत आहे.

शुक्रवारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे किंवा ती वाढण्यीच भीती आहे अशा काही ठिकाणांची यादी तयार करू शकलो तर पुढे काय निर्णय घ्यायचा हे सोपं होईल. असे शकडो ठिकाणं असू शकतात. उर्वरित भागात काही चिंतेची बाब नाही, असे आम्हाला दिसले तर तेथील लॉकडाउन पूर्णपणे काढला जाऊ शकतो. तेथील जनजीवन सुरळीत होऊ शकतं. ज्या भागांमध्ये करोनाची भीती कायम असेल तेथे मात्र काही प्रमाणा किंवा मर्यादित स्वरूपात लॉकडाउन कायम ठेवला जाऊ शकतो.” या अधिकाऱ्याने सांगितले की, “असं केल्याने जिथे धोका अधिक आहे तेथेच जास्त लक्ष केंद्रित करता येईल.”

“लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्या-टप्प्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. “राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्या-टप्प्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न देऊ नका,” अशा सूचनाही मोदी यांनी दिल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

Leave a Comment