लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सुनिल शेवरे

लिंगायत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, इतर मागासवर्ग प्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. व्ही.एस. हुडगे, सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, सरला पाटील, काका कोयटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,संविधानाच्या अंतर्गत लिंगायत समाजाच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेतले जातील. मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक होण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील. आरक्षणाच्या मागण्यांबाबत मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राला अहवाल पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले.

 

Leave a Comment