Monday, February 6, 2023

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

- Advertisement -

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे.

- Advertisement -

करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचवेळी सरकारनं रेड, ऑरेंज, ग्रीन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील दुकानं उद्यापासून खुली होणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानंही खुली होणार असून, विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.
– प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, माल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.
– स्वतंत्र मद्याची दुकानं खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.
– सलून खुले ठेवता येणार नाहीत.
– परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.